माध्यमिक विद्यामंदिर कॅनडा कॉर्नर नाशिक
"नाशिक जिल्हात नामंकित असलेल्या संस्थेपैकी एक संस्था म्हणजे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था नाशिक संचलित ,क्रांतिवीर व कर्मवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमित विद्यालय स्थापन झाले आहे . माध्यमिक विद्यामंदिर कॅनडा कॉर्नर नाशिक विद्यालय शहरात मध्यवर्ती ठिकाणी असून गुणवान संपन्न विद्यालय अशी नावारूपाला आलेले विद्यालय असून विद्यालयाची प्रशस्त इमारत आहे .विद्यालयाचे वैशिष्टे पुढील प्रमाणे ,१)विद्यालय 8 वी ते 10 वी (माध्यम -मराठी व सेमी ) माध्यमातून शिक्षण दिले जाते .2)विद्यालयास प्रशस्त इमारत आहे .३ )गुणवत्ता वाढीसाठी अनुभवी व गुणवान संपन्न शिक्षक वर्ग .४ )विद्यालयामार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रम ,विविध स्पर्धा परीक्षा ,करीयर मार्गदर्शन, ,खेळ ,शिष्यवृत्ती परीक्षा ,पाककला स्पर्धा स्पर्धचे आयोजन केले जाते .५)विद्यालय भौतिक सुविधा युक्त असून खेळासाठी मैदान ,प्रशस्त क्लास रूम ,डिजिटल क्लास रूम ,सुसज्ज संगणक लॅब आहे .६ )विविध पुस्तकांनी समृध्द असे ग्रंथालय आहे .७)विद्यार्थ्याकडे शिक्षकांचे वैयक्तिक लक्ष दिले जाते व पालकांशी सतत संपर्क ठेवला जातो .८)विविध सभेचे आयोजन विद्यालय मार्फत केले जाते त्यामुळे शाळा पालक विद्यार्थी यामध्ये समन्वय राखला जातो .९ )विद्यालयातील इयत्ता 8 वी इयत्तासाठी पोषण आहार व पूरक आहार दिला जातो .मोफत पाठ्यपुस्तक ही 8 वी इयत्ता साठी दिले जाते .१० )विद्यालयमार्फत शैक्षणिक सहल ,वनभोजन ,क्षेत्रभेट आयोजन केले जाते .११)विद्यालयामार्फत विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात .उदा मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ,एसटी विद्यार्थ्यासाठी सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती ,राजेश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती राबवल्या जातात .१२) विद्यालय शैक्षणिक अध्यापना बरोबर खेळ ,शाररिक मानसिक आरोग्यावर लक्ष दिले जाते . "

OUR GALLERY








Contact Us

Address
डोंगरी वस्ती गृह मैदान ,कॅनडा कॉर्नर नाशिक

Call Us
9403098526

Email Us
mvmcc2003@gmail.com